Tharala Tar Mag: योगायोगच म्हणावा! ठरलं तर मग फेम अभिनेता रिल अन् रियल आयुष्यात एकाच दिवशी झाला बाबा
Tharala Tar Mag Pratik Suresh: ठरलं तर मग फेम अभिनेता अश्विन म्हणजे प्रतीक सुरेश खऱ्या आयुष्यात बाबा बनला आहे. पण ज्यादिवशी तो बाबा बनला एक योगायोग जुळून आला आहे,

ठरलं तर मग या मालिकेतील अश्विन म्हणजेच प्रतीक सुरेश याच्या आयुष्तही एक नव्या जबाबदारीची सुरुवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यानं तो लवकरच बाबा होणार असं म्हटलं होतं. आता त्यानं एक मोठी गुडन्यूज दिली आहे.
ठरलं तर मग फेम मालिकेतील अभिनेता अश्विन म्हणजेच प्रतीक सरेशने आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्याला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. 3 नोव्हेंबर रोजी त्याच्या आयुष्यात हे नवीन वळण आले आहे.
विशेष म्हणजे प्रतीक सुरेशबाबत एक अनोखा योगायोग घडला आहे. तो रिल आयुष्यात आणि रियल आयुष्यात बाबा बनला आहे. प्रतीक ज्यादिवशी खऱ्या आयुष्यात बाबा झाला नेमकं त्या दिवशी मालिकेतही तसंचत काहीसं घडलं
मालिकेत प्रियाने बाळाला जन्म दिल्याचे दाखवले आहे. ते या दिवशी दाखवले जेव्हा प्रतिक खऱ्या आयुष्यातही बाबा झाला. त्यामुळे रिल आणि रियल आयुष्यात तो एकाच दिवशी बाबा झाला आहे.
रील लाईफमध्ये त्याला मुलगी झाल्याचे पाहायला मिळत आहे तर रियल आयुष्यात मात्र त्याला मुलगा झाला आहे. मुलगा झाल्याचे सोशल मीडियावर शेअर करताच त्याला अनेकांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.