
शारिबने ओटीटी प्लेटफॉर्मवर आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. प्रोफेशनल लाइफ शिवाय खूप कमी लोकांना अभिनेत्याच्या लव्ह लाइफबद्दल माहिती आहे. पर्सनल लव्ह स्टोरी कुठल्या चित्रपटापेक्षा कमी नाही.

शारिबने 30 वर्षांपूर्वी नसरीन बरोबर लग्न केलं. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात अनेक चढ-उताराचे क्षण आले. पण दोघे सोबत राहिले. शारिब नेहमीच त्याच्या यशाचं श्रेय पत्नीला देतो.

शारिबने जेव्हा नोकरी सोडून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं, तेव्हा नसरीनने त्याला सपोर्ट केला.अभिनेत्याच्या कठीण काळात पत्नी त्याच्यासोबत उभी राहिली. त्याला इथपर्यंत आणण्यात तिचा मोठा वाटा आहे.

एका मुलाखतीत शारिब म्हणालेला की, जेव्हा त्याने अभिनयासाठी जॉब सोडला, त्यावेळी कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागलेला. त्यावेळी पत्नीने कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी आपली ज्वेलरी विकलेली.

या सगळ्या प्रवासात नसरीनचा चारवेळा कॅन्सर बरोबर सामना झाला. चारवेळा तिने ही लढाई जिंकली. नसरीनला ओरल कॅन्सर होता. चारवेळा या लढाईत शारिब पूर्णवेळ तिच्यासोबत उभा राहिला. आपलं नातं अजून मजबूत केलं.