
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबांना हिरेजडीत सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात आलं. सांगायचं झालं तर, दरवर्षी भक्त मोठ्या प्रमाणात दान करत असतात... आता देखील हिरेजडीत सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात आलं आहे.

655 ग्रॅम वजनाचा तथा 80 लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण साईबाबांना अर्पण करण्यात आला आहे. आकर्षक नक्षिकाम असलेला हिरे जडीत सुवर्ण मुकुट प्रचंड सुंदर दिसत आहे.

हरियाणाच्या फरीदाबाद येथील साईभक्त प्रदीप मोहंती यांच्याकडून साई चरणी सुवर्ण मुकूट अर्पण करण्यात आला आहे. मुकुटात 585 ग्रॅम शुद्ध सोने आणि सुमारे 153 कॅरेटचे मौल्यवान हिरे जडलेले आहेत.

साई संस्थानकडून दानशूर साईभक्ताचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला. प्रदीप मोहंती यांनी अर्पण करण्यात आलेल्या मुकुटाचा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.यासोबतच विविध राज्यांमधून निघालेल्या पायी पालख्याही शिर्डीत दाखल झाले.