
पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये कोरोना निदान आता काही तासात होणार आहे.

सीएसटीपीएल फाउंडेशनच्या वतीने दौंड तालुक्यात कोरोना टेस्टसाठी RTPCR प्रयोगशाळा उभारली आहे यासाठी सुमारे 1 कोटी रुपयांची सुसज्ज प्रयोगशाळा तयार केली आहे.

नव्या RTPCR प्रयोगशाळेत शासनाने निश्चित केलेल्या दराच्या अर्ध्या दरात चाचणी केली जाणार असून सहा तासात चाचणीचे अहवाल रुग्णांना प्राप्त होणार आहेत.

यामुळे तालुक्यातील तसेच परिसरातील कोरोना रुग्णांना माफक दरात आरटीपीसीआर चाचणी होणार असून यामुळे त्वरित आणि योग्य उपचार होण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी दौंडमधील कोरोना रुग्णांना RTPCR टेस्ट करण्यासाठी पुण्याला जावा लागत होते मात्र दौंड तालुक्यातील रुग्णांची परवड या RTPCR प्रयोगशाळेमुळे थांबणार आहे.