
मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये 'Dateभेट' चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे.

लंडनला चित्रपटाचं चित्रीकरण करत तिनं 'युवा डान्सिंग क्विन'च्या सेटवरसुद्धा हजेरी लावली आहे.

'युवा डान्सिंग क्विन'चं चित्रीकरण करण्यासाठी ती चक्क एक दिवसासाठी भारतात परतली होती.

एक दिवसासाठी भारतात येऊन एवढा मोठा प्रवास करुनसुद्धा ती या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. या स्पेशल लूकमध्ये तिनं 'युवा डान्सिंग क्विन'च्या सेटवर फोटोशूट केलं आहे.

''युवा डान्सिंग क्विन'चा हा भाग स्पेशल आहे. कारण एक दिवसासाठी लंडनहून भारतात येत हे शूट पूर्ण केलं'. असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहे.