Post Office ची ही योजना कमालीची, केवळ व्याजातून कमवा लाखो रुपये

पोस्ट ऑफीसची नॅशनल सेव्हींग्स सर्टीफिकेट (NSC) स्कीम सुरक्षित गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे. यात सध्या 7.7% टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. जर तुम्ही 10 लाख रुपये यात गुंतवले तर 5 वर्षात केवळ व्याजातून तुम्ही 4.5 लाख रुपयांपर्यंत कमावू शकतात.

| Updated on: Dec 21, 2025 | 7:34 PM
1 / 5
 जर तुम्ही कोणताही धोका न पत्करता सुरक्षित गुंतवणूक करु इच्छीता तर पोस्ट ऑफीसची नॅशनल सेव्हींग्ज सर्टीफिकेट (NSC) स्कीम चांगली योजना आहे. यात तुमचा पैसा पूर्ण सुरक्षित रहातो आणि सरकारची गॅरंटी मिळते. ही स्कीम त्या लोकांसाठी चांगली आहे ज्यांना बाजाराच्या चढ-उतारापासून वाचून भविष्यासाठी फंड बनवू शकता.

2 / 5
या स्कीममध्ये सध्या  7.7 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. जर तुम्ही यात 10 लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल तर 5 वर्षांनंतर तुम्हाला 14.49 लाख रुपये मिळतील. म्हणजे केवळ व्याजातूनच तुम्ही  4.5 लाख रुपये कमावू शकता. यात व्याजावर कंपाऊडिंगचा फायदा मिळतो.

3 / 5
 NSC ची मॅच्युरिटीचा कालावधी  5 वर्षांचा असतो. यात तुम्ही किमान 1,000 रुपायांनी गुंतवणूक सुरु करु शकतात. चांगली गोष्ट म्हणजे यात गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार किती पाहिजे  तेवढी रक्कम गुंतवू शकता.

4 / 5
 NSC योजनेत पैसा गुंतवल्यानंतर तुम्हाला टॅक्स सुट देखील मिळते. आयकर कलम 80C अंतर्गत तुम्हा वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या टॅक्स कपातीचा लाभ देखील घेऊ शकता. दरवर्षी जोडले जाणारे व्याज देखील पुन्हा गुंतवणूक मानले जाते. त्यामुळे टॅक्समधून सुट मिळते.

5 / 5
हे खाते केवळ भारतीय निवासी व्यक्तीच उघडू शकतो. एनआरआय किंवा कंपन्यांना परवानगी नाही. तुम्ही एकट्याचे किंवा जॉईंट अकाऊंट देखील खोलू शकता. 10 वर्षांहून मोठे मुल देखील स्वत:च्या नावाने NSC खाते खोलू शकते. तर 10 वर्षाहून लहान मुलांच्या नावे पालक खाते खोलू शकतात.