
कर्नाटकातील मंगळूरू येथे गांधीजींचे एक खास मंदिर आहे, ज्यामध्ये दररोज त्यांची पूजा केली जाते. महात्मा गांधींचे हे मंदिर मंगळूरूच्या श्री ब्रह्मा बैदरकला क्षेत्र गरोडी येथे बांधले गेले आहे.

महात्मा गांधींचे अनेक अनुयायी या मंदिरात येतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सत्य आणि अहिंसा मार्गाचा अवलंब करण्याचा संकल्प करतात.

येथे 1948मध्ये गांधीजींचा मातीचा पुतळा बसवण्यात आला होता. त्यानंतर 2006 मध्ये लोकांच्या मागणीनुसार येथे मंदिर बांधण्यात आले आणि गांधीजींचा संगमरवरी पुतळा बसवण्यात आला. येथे गांधीजींची दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते आणि आरती देखील केली जाते.

गांधी जयंतीच्या दिवशी या मंदिरात विशेष पूजेचे आयोजन केले जाते. फळं आणि मिठाईबरोबरच गांधीजींच्या पुतळ्यावर ब्लॅक कॉफी अर्पण केली जाते आणि ती प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटली जाते.

ओरिसाच्या संबलपूर जिल्ह्यातील भटारा गावातही महात्मा गांधींचे मंदिर आहे. या मंदिरात तांब्यापासून बनवलेली गांधीजींची 6 फूट उंच मूर्ती आहे. ज्या घरात महात्मा गांधींचा जन्म झाला त्याच घराचे संग्रहालयात रूपांतर झाले, त्याचे नाव ‘कीर्ती मंदिर’ असे आहे.