
ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र, यावर कधीच ऐश्वर्या राय किंवा अभिषेक बच्चन यांनी भाष्य केले नाही.

आता नुकताच एक मोठा खुलासा करण्यात आलाय. ऐश्वर्या राय ही सासू जया बच्चन यांना 'मां' म्हणते मां याच नावाने सासू जया बच्चन यांना ऐश्वर्या राय हाक मारते.

जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये घरात सतत खटके उडत असल्याची देखील चर्चा मध्यंतरी रंगताना दिसली. यावर काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांनी मोठे भाष्य केले होते.

जया बच्चन म्हणाल्या की, मी कधीही ऐश्वर्या रायला काही बोलले तरीही ती माझे ऐकून घेते. ती मला कधीच उलटे उत्तर अजिबातच देत नाही.