Apple iPhone 17 वर मोठी ऑफर, थेट 20 हजारांनी.. बंपर सेल किंमती..
Apple iPhone 17 ची लोकांमध्ये प्रचंड मोठी क्रेझ आहे. त्यातच आता अत्यंत स्वस्तामध्ये आयफोन Apple iPhone 17 मिळणार आहे. फ्लिपकार्टने मोठा धमाका केला. बंपर सेलमध्ये हा फोन अगदी स्वस्तामध्ये मिळतोय.

Apple iPhone 17 ने मोठा धमाका केला. iPhone 18 आल्यानंतर iPhone 17 स्वस्त होईल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात उलटे घडले. थेट कंपनीने किंमतीमध्ये मोठी वाढ केली. त्यातच आता Apple iPhone 17 स्वस्तामध्ये खरेदी करण्याची मोठी संधी आहे.
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये Apple iPhone 17 स्वस्ता मिळणार आहे. Apple ने सप्टेंबर महिन्यात Apple iPhone 17 ला 82,900 रूपयांमध्ये लॉन्च केले. जवळपास लोक Apple iPhone 17 स्वस्त होण्याची वाट पाहत होते. पण कंपनीने त्याची किंमत थेट 99,900 केली.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 9 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. 24 तास अगोदर प्लस आणि ब्लॅक मेंबर्स अगोदरच एक्सेस मिळेल. सेल सुरू होण्यापूर्वीच कंपनीने काही डीलचा खुलासा केला. Apple iPhone 17 आपल्याला 79,999 रूपयांमध्ये मिळणार आहे.
फ्लिपकार्टकडून मिळणारी डिल्स सर्वात बेस्ट असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पुन्हा फोनची किंमत 99,900 रूपये होईल. Apple iPhone 17 सर्वात चर्चेत असलेला आयफोन आहे. प्रत्येकाला आज हा फोन हवा आहे.
iPhone 17 मध्ये 6.3-इंचाचा LTPO Super Retina XDR OLED डिस्प्ले आहे. अनेक फिचर्स या फोनकडून ग्राहकांना मिळत आहेत. या फोनची प्रचंड क्रेझ आहे. त्यातच फ्लिपकार्टककडून सेलचा धमाका करण्यात आला.