
केस गळती आणि केस पांढरे होण्याची समस्या आता वाढत चालली आहे. कमी झोप, व्यवस्थित जेवण नाही यासोबतच वाढलेले प्रदूषण अशा असंख्य कारणामुळे केस गळती आणि केस पांढऱ्या होण्याच्या समस्या वाढल्या आहेत.

हैराण करणारे म्हणजे अगदी कमी वयाच्या मुलांचे आणि मुलींचेही केस पांढरे होतात. याचे प्रमुखे एक कारण म्हणजे सतत मोबाईल फोन वापरणे हे देखील एक आहे.

पांढरे केस होणे टाळण्यासाठी आणि केस गळती थांबवण्याकरिता काही महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपण फॉलो केल्याने या समस्या कायमच्या दूर राहतील.

केसांसाठी सर्वात फायदेशीर कोरफड असते. आठवड्यातून एकवेळातरी आपण कोरफड केसांना लावली पाहिजे. शिवाय कांदाही फायदेशीर असतो, कांद्याचा रस केसांना लावा.

जास्वंदाच्या फुलामध्ये अनेक घटक असतात. अशावेळी जास्वंदाचे फुल मिक्सरमध्ये बारीक करा आणि त्यामध्ये कडीपत्ता मिक्स करून केसांना लावा. केस गळतीची समस्या दूर होईल.