
नुकताच बाॅलिवूड अभिनेत्री मौनी रॉय हिच्या मालकीच्या रेस्टॉरंटची ओपनिंग ही झाली आहे. मुंबईतील अंधेरी भागामध्ये मौनी रॉय हिचे रेस्टॉरंट आहे. फक्त मौनी रॉय हिच नाही तर अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींचे स्वत:च्या मालकीचे रेस्टॉरंट आहेत.

प्रियांका चोप्रा हिचे देखील न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंट आहे. सोना नावाचे रेस्टॉरंट हे प्रियांका चोप्रा हिचे आहे. प्रियांका चोप्रा हिचे एक इंडियन रेस्टोरेंट आहे. 2021 मध्ये हे रेस्टॉरंट लॉन्च करण्यात आले.

शिल्पा शेट्टी ही देखील एका आलिशान रेस्टॉरंटची मालकीन आहे. मुंबईमध्ये शिल्पा शेट्टी हिचे हे रेस्टॉरंट आहे. विशेष म्हणजे या रेस्टॉरंटला अनेक बाॅलिवूड स्टार हजेरी लावतात.

जॅकलीन फर्नांडीज ही देखील दोन रेस्टॉरंटची मालकीन आहे. जॅकलीन फर्नांडीज हिचे एक रेस्टॉरंट मुंबईमध्ये तर दुसरी रेस्टॉरंट हे श्रीलंकेमध्ये आहे. त्यामधून चांगली कमाई ही जॅकलीन करते.

जूही चावला ही देखील रेस्टॉरंटची मालकीन आहे. रुए डू लिबन या आलिशान रेस्टॉरंटची मालकीन ही जूही चावला आहे. रेस्टॉरंटमधून तगडी कमाई ही जूही चावला करते.