शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि शक्ती देणारे ‘हे’ 5 नैसर्गिक प्रथिनयुक्त पदार्थ

आजच्या फास्टफूडच्या काळात आपण शारीरासाठी उपयुक्त पदार्थ खाणं विसरलो आहोत. पण हे आरोग्यासाठी फार हानीकारक आहे. म्हणून अशा काही पदार्थांबद्दल जाणून घ्या जे नैसर्गिक प्रथिनयुक्त आहेत. एवढंच नाहीतर, या पदार्थांचा आरोग्यास देखील फार मोठा फायदा होतो...

| Updated on: Apr 23, 2026 | 3:48 PM
1 / 5
आपल्याला चणे आणि विविध प्रकारच्या कडधान्यांमधूनही प्रथिने मिळू शकतात. एक कप शिजवलेल्या मसूरमध्ये सुमारे 18 ग्रॅम प्रथिने असतात असे म्हटले जाते. त्यामुळे कडधान्य तुम्ही रोजच्या आहारात सामाविष्ट करु शकता...

आपल्याला चणे आणि विविध प्रकारच्या कडधान्यांमधूनही प्रथिने मिळू शकतात. एक कप शिजवलेल्या मसूरमध्ये सुमारे 18 ग्रॅम प्रथिने असतात असे म्हटले जाते. त्यामुळे कडधान्य तुम्ही रोजच्या आहारात सामाविष्ट करु शकता...

2 / 5

आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रथिने मिळवण्यासाठी अंडी हा एक उत्तम मार्ग आहे. ती ऑम्लेटच्या स्वरूपात, उकडून किंवा इतर प्रकारे शिजवून खाल्ली जाऊ शकतात. चार मोठ्या अंड्यांमधून सुमारे 24 ग्रॅम प्रथिने मिळतात.

3 / 5

अनेकांना चिकन आवडत नाही. ज्यांना चिकन आवडत नाही, त्यांच्यासाठी सोयाबीन हा एक उत्तम पर्याय आहे. फक्त 50 ग्रॅम सुक्या सोया फ्लेक्समध्ये सुमारे 25 ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे सोयाबीन तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतील...

4 / 5

ग्रेव्ही बनवताना त्यात पनीर घातल्याने शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन मिळण्यास मदत होते. असे म्हटले जाते की १०० ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन असते.

5 / 5

साध्या दह्यापेक्षा ग्रीक योगर्टमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. तुम्ही नाश्त्यामध्ये फळे आणि सुकामेव्यासोबत ग्रीक योगर्ट खाऊ शकता. 200 ग्रॅम योगर्टमधून तुम्हाला सुमारे 18 ते 20 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात. त्यामुळे हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us