
भारतीय राजकारणात अनेक नेते असे आहेत ज्यांच्या परदेशात शिक्षण घेत असताना प्रेम प्रकरणातून विवाह झालेला आहे. या नेत्यांनी परदेशी महिलेशी लग्न केल्यानंतर राजकारणात मोठ्या पदांची जबाबदारी पार पाडली आहे. या यादीत माजी पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

सर्वात आधी बोलायचे झाले तर देशाचे ६ वे पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९६८ मध्ये इटलीच्या सोनिया माईनो यांच्याशी लग्न केले. त्या दोघांची भेट इंग्लंडच्या कॅम्ब्रिज विद्यापीठात झाली. त्यांची प्रेमकहानी आणि लग्न आजही चर्चेचा विषय असते.

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फाऊक अब्दुल्ला यांचे नाव देखील यादीत आहे.त्यांनी १९६८ ब्रिटीश मूळ असलेल्या नर्स मॉली यांच्याशी विवाह केला. मॉली नेहमीच राजकीय क्षेत्रात फारुक यांच्यासोबत राहिल्या.

सध्याचे परराष्ट्र मंत्री आणि गुजरातचे राज्यसभा सदस्य एस.जयशंकर यांची पत्नी जपानी मूळ असलेल्या आहेत. क्योको यांची आणि जयशंकर यांची भेट आंतरराष्ट्रीय संबंधात काम करताना झाली. त्यांनी कौटुंबिक जीवन खूपच शांत आणि खाजगी आहे.

साऊथ स्टार ते राजकारणी असा प्रवास करणारे पवन कल्याण यांचे जीवन चर्चेत असते. त्यांनी दोन लग्नानंतर २०१३ मध्ये रशियन अभिनेत्री एना लेज्हनेवा यांच्याशी लग्न केले.

काँग्रेस नेते शशी थरुर यांचा दुसरे लग्न कॅनाडा राजकीय अधिकारी क्रिस्टा जाईल्स यांच्याशी झाले. त्यांचे लग्न साल २००७ मध्ये झाले आणि साल २०१० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.थरुर यांचे लग्न खुपच चर्चेत होते. प्रेमाला सीमांचे बंधन नसते असे या नेत्यांची प्रेमप्रकरण पाहून वाटते.