
बाॅलिवू़ड अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला होता.

सलमान खान हा सर्वांच्याच मदतीला नेहमीच धावताना दिसतो. सलमान खान हा आता कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. मात्र, सलमान खान याच्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी आली होती, त्याच्याकडे कपडे खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते.

सलमान खान याला काहीही खरेदी करताना 100 वेळा विचार करावा लागत होता. एका पुरस्कार सोहळ्यामध्ये याबद्दल सांगत असताना सलमान खान याच्या डोळ्यातून पाणी आले होते. चक्क एका अभिनेत्याने त्याला कपडे खरेदी करून दिले होते.


जीन्स आणि शर्टमध्ये घ्यायचे होते. परंतू मी पैसे नसल्याने फक्त जीन्स खरेदी केली आणि शर्ट नाही. परंतू त्यावेळी मला सुनिल शेट्टी यांनी एक शर्ट गिफ्ट केला. माझ्या वाईट काळात ते माझ्या मदतीला धावून आले.