44 एकर जमिनीची मालकीण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री; शेतकऱ्यांना मोफत दिली जमीन, कोण आहे ती?
44 एकर जमिनीची मालकीण असणाऱ्या या बॉलिवूड अभिनेत्रीने लॉकडाऊनमध्ये भूमिहीन शेतकऱ्यांना दान म्हणून दिलेली जमीन. इंडस्ट्रीपासून दूर राहून आता करतेय शेती. कोण आहे ती?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावला आपल्या अभिनयासोबतच आलिशान जीवनशैली आणि सामाजिक कार्यामुळेही चर्चेत असते.
जूहीकडे कोट्यवधी रुपयांची शेतीची जमीन असून, ती गेल्या अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये तिने भूमिहीन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपल्या जमिनीचा काही भाग दान करण्याचा निर्णय घेतला होता.
लॉकडाऊनच्या काळात जूही चावलाने मांडवा परिसरातील आपली जमीन भूमिहीन शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला होता. या जमिनीवर शेतकरी भाताची शेती करू शकतील असे तिने सांगितले होते. या निर्णयातून तिची शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता दिसून आली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जूही चावलाकडे महाराष्ट्रातील वाडा येथे 20 एकर जमीन आहे. ही जमीन तिच्या वडिलांनी खरेदी केली होती. वडिलांच्या निधनानंतर जूहीने शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. ती गेल्या 15 वर्षांपासून शेतीच्या कामात सक्रिय असल्याचे सांगितले जाते.
याशिवाय, मांडवा येथे तिने स्वतः खरेदी केलेली 10 एकर जमीन असल्याचेही रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे. तिच्या मालकीची एकूण 44 एकर शेतीची जमीन असल्याचा दावा केला जातो.