
असे बरेच बाॅलिवूड स्टार आहेत. ज्यांना सरकारकडून सुरक्षा देण्यात आलीये. अनेक बाॅलिवूड स्टार यांना जीवे मारण्याच धमक्या या मिळाल्या आहेत. ज्यानंतर त्यांना सरकारी सुरक्षा देण्यात आली.

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याला सरकारकडून सुरक्षा देण्यात आलीये. सलमान खान याची खासगी सुरक्षा देखील आहे. सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने सलमान खान सुरक्षा देण्यात आलीये.

कंगना राणावत ही देखील तिच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. यापूर्वी अनेकदा कंगना राणावत हिला देखील जीवे मारण्याच्या धमक्या या देण्यात आल्या आहेत. यामुळे तिला सरकारी सुरक्षा दिली आहे.

बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांना देखील काही वर्षांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. यामुळेच अमिताभ बच्चन यांनाही सरकारी सुरक्षा देण्यात आली.

अनुपम खेर हे नेहमीच कोणत्याही विषयावर आपले मत मांडताना फार काही विचार करत नाहीत. यामुळे त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात. त्यांनाही सरकारी सुरक्षा देण्यात आलीये.