
तृणमूल काँग्रेस (TMC) च्या आसाम युनिटच्या सदस्य व कार्यकर्त्यांनी गुवाहाटीमधील रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर निदर्शने केल्याची घटना घडली आहे. आ,आसाममदध्ये पूर आला असून सरकार महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांना सुरक्षा पुरवण्यात व्यस्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अनेक बंडखोर शिवसेना आमदार हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. हॉटेलमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली असून आसाम पोलिसांनी हॉटेलच्या खासगी रक्षकांकडून सुरक्षा घेतली आहे.

टीएमसी सदस्य आणि कार्यकर्ते सकाळी हॉटेलबाहेर जमले आणि बंडखोर आमदारांचा निषेध करू लागले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रिओन बोरा हे आंदोलनाचे नेतृत्व करत होते.

काही वेळातच आंदोलक टीएमसी नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आसाममधील सुमारे 20 लाख लोक पुरामुळे त्रस्त आहेत. पण मुख्यमंत्री (हिमंता बिस्वा सरमा) महाराष्ट्र सरकार पाडण्यात व्यस्त आहेत असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

राज्यावर पुराचे संकट आले आहे. मात्र भाजप सत्तेसाठी आंधळा झाला आहे. आसाममध्ये पूर आला आहे, पंतप्रधानांनी राज्याचा दौरा करावा, विशेष पॅकेज जाहीर करावे पण ते महाराष्ट्र सरकार पाडण्यात व्यस्त आहेत भाजपसाठी फक्त सत्ताच सर्वस्व आहे:

यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी तसेच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गो बॅक अश्या घोषणाबाजीही करण्यात आली.