Todays Gold Rate: सोनं सर्वात स्वस्त! थेट 9000 रुपयांची घसरण, नवा 10 ग्रॅमचा भाव पाहून कराल खरेदी

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून आकाशाला स्पर्श करणाऱ्या सोन्याचा भाव धडाम झाला आहे. आजच्या सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे.

| Updated on: Feb 02, 2026 | 3:59 PM
1 / 5
अर्थसंकल्प 2026 सादर झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर सर्वाधिक कोसळले आहेत. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण झाली आहे. सोने थेट 9800 रुपयांनी घसरले आहे. जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

अर्थसंकल्प 2026 सादर झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर सर्वाधिक कोसळले आहेत. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण झाली आहे. सोने थेट 9800 रुपयांनी घसरले आहे. जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

2 / 5

भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात मौल्यवान धातू म्हणून सोने ओळखले जाते. शुभ कार्याच्या वेळी अंगावर सोने घालण्याची परंपरा कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे भाव सतत वाढत आहेत. मात्र, आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.

3 / 5

आज सोन्याच्या दरात तब्बल 9 हजार 800 रुपये तर चांदीच्या दरात तब्बल 53 हजार रुपयांची घसरण झाली आहे. ही घसरण आजवरची सर्वात मोठी घसरण समजली जात आहे.

4 / 5

आता सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 53 हजार 470 रुपये तर चांदीचे दर 2 लाख 57 हजार 500 रुपयांवर आले आहेत. दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलेले सोन्याचे दर पुन्हा दीड लाखावर तर चार लाखांचा आकडा पार करणाऱ्या चांदीचे दर देखील अडीच लाखांवर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us