Tokyo Olympics : महिला Olympic पटूने लिलावात काढलं रौप्यपदक, कारण वाचून हृदय हेलावेल

| Updated on: Aug 18, 2021 | 6:16 PM

एखाद्या खेळाडूसाठी ऑलिम्पिक खेळांमध्ये पदक मिळवणं याहून मोठी गोष्ट कोणतीच नसते. या पदकाला तो खेळाडू अगदी जीवापाड जपतो. पण एका महिला भालाफेकपटूने मात्र आपलं पदक थेट लिलावात काढलं आहे.

1 / 5
खेळाडूसाठी ऑलिम्पिक खेळांमधील पदकापेक्षा मौल्यवान गोष्ट कोणतीच नसते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळाडू आयुष्यभर मेहनत करतात. अलीकडेच झालेल्या  टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अनेक खेळाडूंनी हे स्वप्न पूर्ण केलं. पोलंड देशाची महिला भालाफेकपटू मारिया आंद्रेयचक (maria andrejczyk) हीने देखील रौप्य पदक जिंकलं. पण घरी परतताच मारियाने पदक लिलावात काढण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आश्चर्यकारक असला तरी यामागील कारण मात्र मन जिंकणारं आहे.

2 / 5
मारियाने पोलंडमधील एका आठ महिन्याच्य़ा बाळाच्या उपचारासाठी पदक लिलावात काढण्याचा निर्णय घेतला. मिलोश्चक मलीसा असं बाळाचं नाव असून या बाळाला एक गंभीर आजार आहे. अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातच या आजारावर उपचार होऊ शकत होता. ज्यासाठी कोट्यवधीं रुपयांची गरज होती.

3 / 5
समोर आलेल्या माहितीनुसार या बाळाच्या उपचारासाठी भारतीय चलणाप्रमाणे तब्बल 2.86 कोटी रुपये लागणार होते. त्यासाठी एक फंडरेजर सुरु असून मारियाने एका फेसबुक पोस्टद्वारे मदतीसाठी आपले पदक लिलावात काढण्याची घोषणा केली.

4 / 5
अनेकांनी मारियाच्या या कृतीचे समर्थन केले. शेवटी पोलंडमधील सुपरमार्केट चेन जाबकाने तब्बल 92.90 लाख रुपयांना हे पदक विकत घेतले. तसेच स्वत:कडूनही मदत म्हणून एकूण 1.43 कोटी रुपये इतकी रक्कम मदत म्हणून दिली. विशेष म्हणजे ही मदत करताच जाबका कंपनीने मारियाचे पदकही तिला परत देत माणूसकीचे दर्शन घडवले.

5 / 5
मारियाने यंदा दुसऱ्या वेळी ऑलिम्पिकमध्ये सहभागल घेतला होता. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिचे कांस्य पदक थोडक्यात हुकले होते. पण यंदा तिने 64.61 मीटर लांब भाला फेकत थेट रौैप्य पदकाला गवासणी घातली आहे.