
मारुति सुजुकीने ऑगस्ट 2024 मध्ये ब्रेजाच्या 19,190 यूनिट्सची विक्री केली. कंपनीने मागच्यावर्षी याच महिन्यात ब्रेजाच्या 14,572 मॉडल्सची विक्री केलेली. SUV च्या सेल मध्ये 32 टक्के वाढ झाली आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये हुंडई क्रेटाच्या 16,762 यूनिट्सची विक्री झाली. या गाडीच्या विक्रीत प्रतिवर्षी 21 टक्के वाढ झालीय. फेसलिफ्ट मॉडलने क्रेटाची विक्री वाढवली आहे.

सेलच्या बाबतीत तिसऱ्या नंबरवर टाटा पंच आहे. ऑगस्ट महिन्यात 15,643 यूनिट्सची विक्री झाली. SUV चा सेल वर्षाला 8 टक्क्याने वाढला आहे. ही कार पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

चौथ्या नंबरवर महिंद्रा स्कॉर्पियो आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात 13,787 यूनिट्सची विक्री झाली. मागच्या काही महिन्यात स्कॉर्पियोचा सेल वाढत आहे.

मारुती सुजुकी फ्रोंक्स सेलमध्ये पाचव्या नंबरवर आहे. ऑगस्ट 2024 मध्ये 12,387 यूनिट्सची विक्री झाली.