या 5 राज्यातील नागरिकांचे उत्पन्न महाराष्ट्रातील लोकांपेक्षा जास्त, वाचा…

Top Richest States In India : भारतात अशी अनेक राज्ये आहेत जी वेगाने विकसित होत आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, मात्र दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत अनेक राज्ये महाराष्ट्राच्या मागे आहेत.

बापू गायकवाड | Updated on: May 08, 2026 | 7:57 PM
1 / 6
दिल्ली अव्वल स्थानावर : दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत दिल्ली संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर आहे. येथे दरडोई उत्पन्न सुमारे 4,93,024 रुपये वार्षिक आहे. त्यामुळे दिल्ली भारतातील सर्वात समृद्ध प्रदेश मानला जातो, जिथे सरासरी उत्पन्न इतर राज्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे.

दिल्ली अव्वल स्थानावर : दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत दिल्ली संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर आहे. येथे दरडोई उत्पन्न सुमारे 4,93,024 रुपये वार्षिक आहे. त्यामुळे दिल्ली भारतातील सर्वात समृद्ध प्रदेश मानला जातो, जिथे सरासरी उत्पन्न इतर राज्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे.

2 / 6

तेलंगणाची मजबूत स्थिती : तेलंगणा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. येथे दरडोई उत्पन्न सुमारे 3,87,623 रुपये आहे. हैदराबादसारख्या शहरांमुळे राज्याची आर्थिक स्थिती वेगाने मजबूत झाली आहे.

3 / 6

कर्नाटक : कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे, इथे दरडोई उत्पन्न 3,80,906 रुपये आहे. बंगळुरू येथील आयटी उद्योगामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे.

4 / 6

तामिळनाडू : या यादीत तामिळनाडू चौथ्या स्थानावर आहे. येथील दरडोई उत्पन्न 3,61,619 रुपये आहे. औद्योगिक विकास आणि निर्यात आधारित अर्थव्यवस्थेमुळे राज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत बनले आहे.

5 / 6

हरियाणा : हरियाणा पाचव्या स्थानावर आहे. येथील दरडोई उत्पन्न 3,53,182 रुपये आहे. अनेक मोठ्या राज्यांना मागे टाकत हरियाणाने केलेली ही कामगिरी विशेष मानली जाते.

6 / 6

महाराष्ट्र : महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य असले तरी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे. येथे हा आकडा सुमारे 3,09,340 रुपये आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us