Jio Recharge : जिओचे 5 शानदार प्लॅन, प्रत्येक ग्राहकाला मिळणार फायदा

Jio Plan : रिलाएन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असून तिचे अनेक स्वस्त आणि लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्स देशभरातील ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. आज आपण टॉप 5 प्लॅनची माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: May 13, 2026 | 10:04 PM
1 / 5
450 रुपयांचा प्लॅन : जिओने नुकताच 450 रुपयांचा प्लॅन आणला आहे.  या प्लॅनमध्ये 36 दिवसांची वैधता मिळते. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 मोफत SMS दिले जातात.

450 रुपयांचा प्लॅन : जिओने नुकताच 450 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये 36 दिवसांची वैधता मिळते. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 मोफत SMS दिले जातात.

2 / 5

1049 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची लांब वैधता मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज 2GB डेटा दिला जातो. तसेच Sony LIV, ZEE5 आणि JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शनही मिळते.

3 / 5

445 रुपयांचा प्लॅन : OTT स्ट्रीमिंगची आवड असलेल्या ग्राहकांसाठी हा प्लॅन खास आहे. 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 2GB डेटा मिळतो. यामध्ये Sony LIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Chaupal, Hoichoi आणि JioHotstar चे फ्री सबस्क्रिप्शन दिले जाते.

4 / 5

666 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये 70 दिवसांची वैधता दिली जाते. ग्राहकांना 70 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 1.5GB डेटा आणि दररोज 100 मोफत SMS मिळतात.

5 / 5

1199 रुपयांचा प्लॅन : ज्यांना जास्त इंटरनेट डेटा हवा आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन खास आहे. यात 84 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 3GB डेटा मिळतो. यासोबत दररोज 100 मोफत SMS देखील दिले जातात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us