दारू पिण्यात महाराष्ट्र टॉप 5 मध्ये! पहिल्या क्रमांकावर कोणतं राज्य? चकीत व्हाल

Highest alcohol consumption states in india : भारतात सर्वाधिक दारू कोणत्या राज्यात प्यायली जाते, याची माहिती अलिकडेच एका अहवालातून समोर आली आहे. या यादीत महाराष्ट्राचं नाव पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण पहिल्या क्रमांकावर असलेल्या राज्याचं नाव कोणतं? तसेच या राज्यांमध्ये वर्षाला किती दारूच्या केसेस म्हणजेच बॉक्सेसची विक्री होते?

| Updated on: Nov 13, 2026 | 11:14 PM
1 / 5
पहिल्या क्रमांकावर कर्नाटक – या यादीत कर्नाटक अव्वल स्थानी असून, वर्षाला सुमारे 6.9 कोटी दारूचे बॉक्स खपतात.

पहिल्या क्रमांकावर कर्नाटक – या यादीत कर्नाटक अव्वल स्थानी असून, वर्षाला सुमारे 6.9 कोटी दारूचे बॉक्स खपतात.

2 / 5

दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू – तामिळनाडूमध्ये TASMAC या सरकारी मद्यविक्री नेटवर्कच्या माध्यमातून वर्षाला जवळपास 6.4 कोटी दारूचे बॉक्स विकले जातात.

3 / 5

तिसऱ्या क्रमांकावर तेलंगणा – तेलंगणामध्ये 40 टक्क्यांहून अधिक पुरुष मद्यसेवन करतात, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. येथे वर्षाला सुमारे 3.7 कोटी दारूचे बॉक्स खपतात.

4 / 5

चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश – आंध्र प्रदेशमध्ये वर्षाला जवळपास 3.5 कोटी दारूचे बॉक्स वापरले जातात. त्यामुळे हे राज्य यादीत चौथ्या स्थानावर आहे.

5 / 5

पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र – देशात सर्वाधिक दारू विक्री होणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असून, वर्षाला सुमारे 2.7 कोटी दारूचे बॉक्स खपतात, असा अहवालामध्ये दावा करण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us