विकेंडचा आनंद घेण्यासाठी पर्यटन स्थळ गजबजले, गर्दीचा हा महापूर पाहा

शनिवार अन् रविवारची सुटी साधून पर्यटक मोठ्या संख्येने वर्षासहलीसाठी निघाले आहे. यामुळे अनेक पर्यटन स्थळे चांगलीच गजबजली आहेत. सिंधुदुर्गमधील आंबोलीत पर्यटकांचा महापूर आलाय.

| Updated on: Jul 16, 2023 | 4:18 PM
1 / 5
विकेंडच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आंबोलीत तुफान गर्दी झाली आहे. राज्यासह परराज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर आंबोलीत दाखल झाले आहेत.

2 / 5
रस्त्याच्या कडेला असलेल्या आंबोली धबधब्यावर पर्यटकांच्या गर्दीचे मोठे लोंढेच्या लोंढे उसळले आहे. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

3 / 5
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून आंबोलीची ओळख आहे. या ठिकाणचे मुख्य आकर्षण म्हणजे आंबोलीच्या परिसरात उंचावरून फेसाळत कोसळणारा धबधबा आहे.

4 / 5
आंबोली प्रमाणे सिंधुदुर्गमधील मांगली धबधबा आकर्षणाचे केंद्र आहे. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर मांगोली हा धबधबा आहे. या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी गर्दी झालीय.

5 / 5
मांगोली धबधबा उंच डोंगर कपारीतून कोसळतो. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावचा मनमोहक धबधबा पर्यटकांना आता आकर्षित करत आहे.