
अनेक लोकांना फिरायला आवडतं. नेहमी प्रवास करणाऱ्या लोकांना माहित असतं की कुठे राहायचं, काय बुक करायचं. कसं करायचं? कुठे करायचं हे त्यांना माहित असतं. पण बुकिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात...

लिफ्टजवळ रूम: रूम ऑनलाईन बुक केल्यामुळे ती लिफ्ट जवळ असू शकते. राहायची सोय जर लिफ्टजवळच्या खोलीत असेल तर काय होईल? कल्पना करणं सुद्धा वाईट आहे.

पॅन्ट्रीजवळ रूम: हॉटेल बुक करताना लोकं ते ऑनलाईन बुक करतात आणि मग तिथे गेल्यावर त्यांना लक्षात येतं की आपली रूम पॅन्ट्री जवळ आहे. पॅन्ट्रीजवळचा वास, त्याचा आवाज या सगळ्याने चिडचिड होते. त्यामुळे रूम बुक करताना दहा वेळा विचार करावा निदान हॉटेल मध्ये जाऊन तशी चौकशी केली जाऊ शकते.

अनेकदा लोक स्वस्त हॉटेलची निवड करतात ज्यात ते फसतात. बजेट बघताना हॉटेल नेमकं कसं आहे ते बघणं राहून जातं आणि मग खरी अडचण होते. थोडासा त्यापलीकडे जाऊन विचार करायला हवा.

जर तुम्ही ग्रुपमध्ये प्रवास करत असाल तर लोकेशनवर जाऊन रूम बुक करावी. आगाऊ बुकिंग केल्यानंतर ही सुविधा उपलब्ध झाली नाही तर मूड खराब होऊ शकतो. लोकेशनबाबत हॉटेलमधून संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर अनेक खोल्या बुक करणे चांगले.