
संग्रहित फोटो

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील लसीकरणासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेतलेला आहे. खावटी अनुदान वाटप कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना लसीकरणाचे कॅम्प लावले गेले.

दुर्गम भागात नसलेल्या मोबाईल नेटवर्कमुळे लसीकरणासाठी समस्या निर्माण होत होत्या. मात्र आदिवासी विकास विभागाच्या खावटी अनुदान वाटप कार्यक्रमांतर्गत कार्यक्रम घेतले जात आहेत.

खावटी अनुदान वाटप कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या प्रमाणात लाभार्थी येत असल्याने आदिवासी विकास विभागाच्या मदतीने जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी लसीकरण कॅम्प सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे या भागातील लसीकरणाला वेग येणार आहे.

आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त कार्यक्रमामुळे दुर्गम भागातील लसीकरण वेगवान होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.