बंद नाक सतावतयं ? हे देशी उपाय करतील मदत

| Updated on: Dec 14, 2022 | 1:16 PM
1 / 5
थंडीच्या दिवसात सर्दी - खोकला होणं ही समस्या खूप सामान्य झाली आहे. सर्दीमुळे आपल्याला रात्रभर त्रास होऊ शकतो. जर नाक रात्रभर बंद असेल तर झोप लागण्यातही अडचण निर्माण होऊ शकते. सर्दीसाठी वारंवार औषधे घेतल्याने आरोग्यावरही परिणाम होतो. मात्र काही देशी, घरगुती उपायांनी सर्दीचा आणि बंद नाकाची समस्या दूर होऊ शकते.

2 / 5
मोहरीचे तेल : सर्दीमुळे नाक बंद होण्याची समस्या वारंवार सतावत असेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता. एका बोटावर मोहरीचे थोडे तेल घेऊन त्याचा वास घ्या. मोहरीचा तेलामुळे चोंदलेले मोकळं होण्यास मदत होते.

3 / 5
ओव्याचा वापर : ओव्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यातील काही तत्वांमुळे बंद नाक लगेच मोकळे होते. थोडासा ओवा तव्यावर भाजून घ्या व नंतर एका रुमालात टाकून गाठ बांधा व त्याचा वास घ्या. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये कापूरही वापरू शकता. या उपायाने लगेच आराम मिळेल.

4 / 5
आलं : आल्यामध्ये असलेले अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म हे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करतात. आलं स्वच्छ धुवून घ्या व त्याचे तुकडे करा. आता त्यातील काही तुकडे तोंडात टाकून चघळत रहा. दिवसभरात 2-3 वेळा हा उपाय करावा. सर्दीमुळे बंद झालेले नाक मोकळे होईल.

5 / 5
कांद्याचा वापर : कांद्यामध्ये अनेक अँटी-ऑक्सीडेंट्स आणि महत्वपूर्ण पोषक घटक असतात, जे श्वसन यंत्रणा निरोगी ठेवण्याचे कार्य करतात. सर्दीमुळे नाक बंद असेल तर कांदा अर्धा कापून घ्या व तो अर्धा तुकडा दिवसभर हुंगत रहा. अन्यथा कांदा पाण्यात घालून त्या पाण्याची वाफही घेऊ शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.