
हळदीला ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्व आहे. विशेष म्हणजे हळद अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळ करण्याचे खूप जास्त फायदे आहेत. यामुळे तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, हळदीमध्ये शुद्धीकरणाचे गुणधर्म असतात जे शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते. अंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने नशीब उजळते.

ज्योतिषशास्त्रानुसार, हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. हळदीने स्नान केल्याने कुंडलीत गुरु ग्रह बदलण्यास सुरूवात होते.

जर तुमचे लग्न जमत नसेल तर हळद अंगोळीच्या पाण्यात टाका आणि दररोज अंघोळ करा, यामुळे लग्न लवकर होण्यास मदत होते.

एक बादली पाण्यात फक्त एक चमचा हळद टाका आणि अंघोळ करा, यामुळे अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. (हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. टीव्ही 9 मराठी कोणत्याही प्रकारे याला मान्यता देत नाही.)