
बालवीर मालिकेत एकेकाळी बालकलाकाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सेन आता मोठी झाली आहे. ही अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटोंद्वारे सतत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अलीकडेच तिने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (सर्व फोटो - @anushkasen0408)

या लेटेस्ट फोटोंमध्ये अनुष्का काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसत आहे. तिने स्विमिंग पूलमध्ये वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. फोटोंसोबतच अनुष्काने 'just keep swimming' अशी कॅप्शनही लिहीली आहे.

अनुष्काने तिचे लेटेस्ट फोटो शेअर करताच तिचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागले. अनेकांनी हे फोटो लाईक करत बऱ्याच कमेंट लिहील्या आहे. तू तापमान वाढवत आहेस, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर 'कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं ?' असा प्रश्न दुसऱ्या युजरने विचारला आहे.

याशिवाय अनेक चाहते फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत. या फोटोंना थोड्याच वेळात 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. टीव्ही व्यतिरिक्त अनुष्का सेन आता चित्रपटांकडे वळत आहे.

ही अभिनेत्री 2023 मध्ये Am I Next या चित्रपटात दिसली होती. वयाच्या 20 व्या वर्षी तिला बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका मिळाली. याआधी 2021 मध्ये ती खतरों के खिलाडी या शोमध्ये दिसली होती. या शो शिवाय बालवीर आणि झाशी की रानी या लोकप्रिय टीव्ही शोमध्येही तिने काम केले आहे.