
दलजीत काैर हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. दलजीत काैर हिने शालिन भनोट याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर निखिल पटेलसोबत लग्न केले.

निखिलसोबतचे हे लग्न फक्त दहा महिनेच टिकले. हे लग्न तुटल्यानंतर अभिनेत्रीला मोठा धक्का बसला. अनेक गंभीर आरोप दलजीत काैरने पतीवर केले.

दलजीत काैर हिने आता मोठा खुलासा केलाय. दलजीत काैर म्हणाली की, निखिलसोबतचे नाते तुटल्यानंतर मला काहीच कळत नव्हते.

यादरम्यानच्या काळात माझे आठ ते दहा किलो वजन वाढले. या वाईट काळात माझ्या मुलाने, घरच्यांनी आणि माझ्या जवळच्या मित्रांनी माझी खूप जास्त साथ दिली.

दलजीत काैर आणि निखिल पटेल यांच्यातील वाद सध्या कोर्टात सुरू आहे. दलजीत काैर ही सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दलजीत काैर दिसते.