
अभिनेत्री मौनी रॉय हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. टीव्ही विश्वात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये देखील पादार्पण केलं.

मौनी रॉय हिच्या पतीबद्दल सांगायचं झालं तर, सूरज नांबियारसोबत (Suraj nambiar) असं तिच्या पतीचं नाव आहे. सूरज नांबियार हा बिझनेसमन आहे. सूरज याच्याकडे 50 कोटीहून अधिक संपत्ती असल्याचं समोर येत आहे.

मौनी रॉय वर्षभरात 1-2 कोटींची कमाई करते. तिची संपत्ती 10 कोटी इतकी आहे. जाहिराती, सिनेमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कोट्यवधींची माया कमावते.

सोशल मीडियावर देखील मौनी कायम सक्रिय असते. मौनी सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.