PHOTO : Tv9-C Voter Exit Poll : महाराष्ट्रासह देशात कुणाला किती जागा?
Tv9-C Voter Exit Poll | देशात पुन्हा मोदी सरकार येण्याचे संकेत एक्झिट पोलने दिले आहेत. दोशात भाजपप्रणित एनडीएला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला केवळ 128 जागा मिळतील, असा अंदाज Tv9-C Voter च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेनेला 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील असा अंदाज Tv9-C Voterने व्यक्त […]
Sachin Patil | सचिन पाटील |
Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Tv9-C Voter Exit Poll | देशात पुन्हा मोदी सरकार येण्याचे संकेत एक्झिट पोलने दिले आहेत. दोशात भाजपप्रणित एनडीएला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला केवळ 128 जागा मिळतील, असा अंदाज Tv9-C Voter च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेनेला 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील असा अंदाज Tv9-C Voterने व्यक्त केला आहे.या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागांमध्ये चौपटीने वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ 2 जागा मिळाल्या होत्या, यंदा काँग्रेसला 8 जागा मिळतील असा अंदाज आहे.उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसणार असून, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष मोठी मुसंडी मारणार असल्याचं चित्र ‘टीव्ही 9’ आणि ‘सी व्होटर’च्या एक्झिट पोलमध्ये दिसून आलं. उत्तर प्रदेशात सपा-बसपाला 40, तर भाजप आणि मित्र पक्षांना 38 जागा मिळतील. तसेच, काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागेल.पश्चिम बंगालमध्ये यंदा कुणाला किती जागा मिळणार, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. ‘टीव्ही 9’ आणि ‘सी व्होटर’च्या एक्झिट पोलमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 29, भाजपला 11 तर काँग्रेसला दोन जागा मिळतील.सर्व एक्झिट पोलनुसार एनडीएला सर्वात जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.