भारतात 2 अद्भुत सापांच्या जाती सापडल्या, साप डोळ्यांना दिसतच नाही; समोर आला की…

भारतात दोन नव्या किलबॅक सापांच्या जाती सापडल्या आहेत. हे साप खूपच विशिष्ट आहेत. भारतात साधारण 500 पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती आढळलेल्या आहेत.

| Updated on: Mar 28, 2026 | 3:44 PM
1 / 5
जैव विविधतेच्या बाबतीत भारत खूपच संपन्न देश आहे. भारतात पक्षी, प्राण्यांच्या अनेक प्रजाती आढळतात. एकट्या सापाच्या भारतात वेगवेगळ्या 500 जाती आहेत. यातील फक्त 60 जातीच विषारी आहेत.

2 / 5
आता भारतातील जैवविधतेत आणखी एक नवा अध्याय जोडला गेला आहे. भारतात दोन नव्या सापांच्या प्रजातीचा शोध लागला असून वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (WII) वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे दोन्ही साप किलबॅक प्रजातीचे आहेत. किलबॅक प्रजातीचे हे साप खूपच दुर्लभ मानले जातात.

3 / 5
याआधी हे साप म्यानमार येथे दिसून आले आहेत. मिझोरमच्या न्गेगपुई वण्यजीव अभयारण्यात तसेच  अरुणाचल प्रदेशमधील नमदाफा नॅशनल पार्कात हे साप आढळून आले आहेत. किलबॅक प्रजातीचे हे साप बिनविषारी असतात. हे साप दलदल, पाण्याच्या आजूबाजूला आढळतात.

4 / 5
किलबॅक प्रजातीचा हा साप हलक्या लाल रंगाचा असतो. या सापाच्या शरीरावर मधून एक रेष दिसते. या सापाची त्वचा गुळगुळीत नव्हे तर खडबडीत असते. म्हणूनच या सापाला किलबॅक साप म्हटले जाते. या सापांची त्वचा चमकदार असते.

5 / 5
किलबॅक साप प्रकाश परावर्तित करतात. त्यामुळेच त्यांचा रंग आजूबाजूच्या वातावरणासारखा दिसतो. म्हणूनच हा साप सहजासहजी लोकांच्या नजरेस पडत नाही. दलदल, चिखलात हा साप पूर्णपणे मिसळून जातो.

Follow Us