Photo | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या कामाची पाहणी

आपण हे काम गतीने करतो आहे. लॉकडाऊनच्या काळात असं वाटलं होतं की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडंसं हळुवारपणे होईल पण त्या काळात सुद्धा प्रकल्पाचं काम मंदावलेलं नाही. मला खात्री आहे, येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकू, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी समृद्धी महामार्गाच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.
- आज प्रथमच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो. या प्रकल्पाचे अप्रतिम काम चालू आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल , असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
- आपण हे काम गतीने करतो आहे. लॉकडाऊनच्या काळात असं वाटलं होतं की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडंसं हळुवारपणे होईल पण त्या काळात सुद्धा प्रकल्पाचं काम मंदावलेलं नाही. मला खात्री आहे, येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकू, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
- या मार्गाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं आहे, सर्वतोपरी काळजी घेऊन आपण हे काम पूर्ण करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. येत्या 1 मे पर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या 1 मे पर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us