
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना त्यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी गोसी खुर्द प्रकल्पाला भेट दिली.

गोसीखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचनक्षमता याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाणून घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गोसी खुर्द धरण प्रकल्पाला भेट दिली, त्यावेळी मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.


उद्धव ठाकरेंनी गोसी खुर्द प्रकल्पाला भेट दिल्यानंतर यांनी आज घोडाझरी शाखा कालवा येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी गोसी खुर्दला जात असताना प्रकल्पग्रस्तांनी उद्धव ठाकरेंचा ताफा रोखला.

घोडाझरी कालव्याची पाहणी करुन निघालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा प्रकल्पग्रस्तांनी रोखला. त्यावेळी गाडीतून खाली उतरत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. गेल्या 35 वर्षांपासून शेतीला पाणी मिळत नसल्याची या शेतकऱ्यांची तक्रार आहे. हजारो कोटी रुपये खर्च करुनही शेती तहानलेलीच असल्याची खंत यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.