
तामिळनाडूमधील चेन्नईजवळ तांबरम रेल्वे स्टेशनजवळ विचित्र प्रकार होतो. या स्टेशनजवळील एक भाग आहे, जिथे फक्त लोकल ट्रेन जाताना त्याची लाईट बंद होतात. हा प्रकार फक्त लोकल ट्रेनमध्येच होतो. मेल/एक्सप्रेस ट्रेनमध्ये अंधार किंवा कोणत्याही तांत्रिक समस्या होत नाही.

तांबरमजवळ रेल्वे लाईनच्या एका छोट्या भागात बसवलेल्या ओएचईमध्ये करंट येत नाही. या परिस्थितीत जेव्हा लोकल ट्रेन एका पॉवर झोनमधून दुसऱ्या पॉवर झोनमध्ये जाते, तेव्हा तिचे लाईट काही काळासाठी आपोआप बंद होतात.

लोकल ट्रेनला ओव्हरहेड वायरमुळे वीजपुरवठा होतो. तांबरम रेल्वे स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमधील करंट संपतो. ट्रेनला दुसऱ्या ओव्हरहेड वायरच्या झोनमध्ये जावे लागते. सेक्शन चेंजमुळे लोकल ट्रेनमध्ये वीजपुरवठा बंद होतो.

वीज पुरवठा बंद होण्याचा हा प्रकार फक्त लोकल ट्रेनमध्ये होतो. जेव्हा एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्या यामध्ये हा प्रकार होत नाही. कारण येथून जेव्हा एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट गाड्या जातात तेव्हा त्या गाड्या डिझेलवर स्वीच होतात, त्यामुळे वीज कनेक्शन अबाधित राहते.

लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा प्रकार आश्चर्यचकीत करणारा ठरतो. लोकल ट्रेन आणि मेल/एक्सप्रेस ट्रेन यांची वीज पुरवठा करणाऱ्या प्रणालीमध्ये काही फरक असतो. त्यामुळे हा प्रकार घडत असतो.