AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc T20i World Cup 2026 : 20 संघ, 55 सामने-1 ट्रॉफी, 7 फेब्रुवारीपासून वर्ल्ड कपचा थरार, पाहा वेळापत्रक

Icc T20i World Cup 2026 Full Schedule : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा रनसंग्राम 7 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होणार? सामने कुठे पाहता येणार? सर्व काही एका क्लिकवर जाणून घ्या.

Icc T20i World Cup 2026 : 20 संघ, 55 सामने-1 ट्रॉफी, 7 फेब्रुवारीपासून वर्ल्ड कपचा थरार, पाहा वेळापत्रक
Icc T20i World Cup 2026 Captains PhotoshootImage Credit source: Icc X account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 05, 2026 | 8:43 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या थराराला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 8 मार्चला वर्ल्ड कप विजेता निश्चित होणार आहे. या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 20 संघ आमनेसामने आहेत. या 20 संघांची 5-5 नुसार 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धेचं भारत आणि श्रीलंकेला यजमानपद मिळालं आहे. भारतात वर्ल्ड कप स्पर्धेचं 2016 नंतर आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेदरम्यान एकूण 20 संघात 55 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे 55 सामने भारतातील 5 आणि श्रीलंकेतील 2 शहरातील 3 अशा एकूण 8 स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.

साखळी फेरीचं वेळापत्रक

साखळी फेरीत प्रत्येक संघाला आपल्या गटातील प्रत्येक संघाविरुद्ध 1 असे एकूण 4 सामने खेळायचे आहेत. साखळी फेरीत 7 ते 20 फेब्रुवारी दरम्यान एकूण 40 सामने खेळवण्यात येणार आहेत. साखळी फेरीत प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ सुपर 8 साठी पात्र ठरतील.

बाद फेरीचा थरार

साखळीनंतर 21 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान सुपर 8 फेरीत एकूण 12 सामने खेळवण्यात येणार आहेत. सुपर 8 मधून उपांत्य फेरीसाठी 4 संघ पात्र ठरतील. तर 4 संघांचं पॅकअप होईल. त्यानंतर 4 आणि 5 मार्च रोजी उपांत्य फेरीत 4 संघ भिडतील. त्यातून अंतिम सामन्यासाठी 2 संघ निश्चित होतील. तर 8 फेब्रुवारीला वर्ल्ड कप विजेता कोण असणार? हे स्पष्ट होईल.

2 देश, 7 शहरं आणि 8 स्टेडियम

भारतातील 5 स्टेडियममध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. तर श्रीलंकेतील 2 शहरांमधील 3 स्टेडियममध्ये सामन्यांचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

भारत आणि श्रीलंकेतील स्टेडियम

  1. वानखेडे स्टेडियम, मुंबई
  2. एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
  3. इडन गार्डन्स, कोलकाता
  4. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
  5. अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
  6. आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
  7. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कँडी
  8. सिंहली स्पोर्ट्स क्लब, कोलंबो

सलग 13 दिवस दररोज 3 सामने

दरम्यान साखळी फेरीत पहिले 13 दिवस दररोज 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेत पहिल्या दिवसापासून (7 फेब्रुवारी) ते 19 फेब्रुवारीपर्यंत चाहत्यांना दररोज 3 सामने पाहायला मिळणार आहेत.

कोणती टीम कोणत्या ग्रुपमध्ये?

  1. ए ग्रुप : टीम इंडिया, पाकिस्तान, यूएसए, नामिबिया आणि नेदरलँड्स.
  2. बी ग्रुप : झिंबाब्वे, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि आयर्लंड.
  3. सी ग्रुप : स्कॉटलँड, वेस्ट इंडिज, इंग्लंड, इटली आणि नेपाळ.
  4. डी ग्रुप : न्यूझीलंड, रशिया, यूएई, अफगाणिस्तान आणि कॅनडा.

बांगलादेशची स्पर्धेतून माघार

आयसीसीने भारताऐवजी श्रीलंकेत सुरक्षेच्या कारणामुळे सामन्यांचं आयोजन करण्याची मागणी फेटाळल्याने बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे बांगलादेशच्या जागी स्कॉटलँडचा समावेश करण्यात आला आहे.

पाकिस्तानचा टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार

तसेच पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध रविवारी 15 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचं जाहीर केलंय. पाकिस्तान सरकार या निर्णयापर्यंत शेवटपर्यंत ठाम राहिल्यास त्यांना 2 पॉइंट्सचा तोटा सहन करावा लागू शकतो.

टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक

सामने टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार?

दरम्यान टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील. तसेच जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल/लॅपटॉप आणि टीव्हीवर लाईव्ह सामन्यांचा थरार अनुभवता येईल.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...