Sania Mirza : लहानपण ते टेनिस कारकीर्द आणि संन्यास.. सानिया मिर्झाचे कधीही न पाहिलेले फोटो

Sania Mirza Unseen Photos : सानिया मिर्झाने तिच्या करिअरमध्ये एकूण 6 ग्रँडस्लॅम आणि 43 दुहेरी विजेतेपदे जिंकली. या काळात भारतीय स्टारने बक्कळ कमाई केली.

| Updated on: Nov 15, 2023 | 1:24 PM
1 / 6
सानिया मिर्झाचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 रोजी मुंबईमध्ये झाला. पण तिचं बालपण हैदराबादमध्ये गेले. तिने तिथूनच शिक्षण पूर्ण  केलं. (Photos : Instagram /Social Media)

सानिया मिर्झाचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 रोजी मुंबईमध्ये झाला. पण तिचं बालपण हैदराबादमध्ये गेले. तिने तिथूनच शिक्षण पूर्ण केलं. (Photos : Instagram /Social Media)

2 / 6

शालेय शिक्षणानंतर, सानियाने हैदराबादमधील सेंट मेरी कॉलेज आणि चेन्नईतील डॉ एमजीआर शैक्षणिक संशोधन संस्था येथून उर्वरीत शिक्षण पूर्ण केले.

3 / 6

फेब्रुवारी 2003 मध्ये सानिया मिर्झाने टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तर फेब्रुवारी 2023 मध्ये ती शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. जवळपास 20 वर्षांच्या कारकिर्दीत तिने सुंदर खेळ करत अनेक सामने, स्पर्धा जिंकत पदकांवर नाव कोरलं.

4 / 6

सानियाला लहानपणापासूनच टेनिस खेळण्याची आवड होती. 13 एप्रिल 2015 रोजी तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले. तेव्हा ती क्रमवारीत नंबर 1 ठरली.

5 / 6

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत सानियाने लग्न केले. एप्रिल 2010 रोजी दोघेही विवाहबद्ध झाले.

6 / 6

अलीकडेच या भारतीय टेनिस स्टारने व्यावसायिक टेनिसला अलविदा केले. जवळपास 20 वर्षांच्या कारकिर्दीत तिने एकूण 6 ग्रँडस्लॅम आणि 43 दुहेरी विजेतेपदे जिंकली. तिला अनेक पुरस्कारही मिळाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us