
उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळत आहे. अनेकदा उर्फी जावेद हिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळतात.

उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक खास ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद हिला खरी ओळख बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये.

उर्फी जावेद हिने नुकताच तिच्या नव्या लूकमधील काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उर्फी जावेद हिने शेअर केलेले हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

उर्फी जावेद हिने निळ्या रंगाच्या साडीमध्ये हे खास फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे काही लोकांना उर्फी जावेद हिचा हा लूक जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळत आहे.

उर्फी जावेद हिने या निळ्या रंगाच्या साडीमध्ये अतरंगी ब्लाउज घातल्याचे दिसत आहे. यामुळे अनेकजण हे उर्फी जावेद हिच्यावर टिका करताना देखील दिसत आहेत.