
उर्फी जावेदच्या ड्रेसबद्दल तुम्ही आतापर्यंत खूप चर्चा ऐकल्या असतील. पण उर्फीच्या लव्ह लाईफबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? एकेकाळी उर्फी बॉलीवूडच्या अभिनेत्यावर जमा फिदा झाली होती.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून शाहिद कपूर आहे. उर्फी जावेदचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. याचा खुलासा खुद्द उर्फीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केला होता.

उर्फीने तिच्या पोस्टमध्ये सांगितले होते की, चॉकलेट हिरो शाहिद कपूरच्या प्रेमात वेडी झाली होती. मात्र जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं होतं.

उर्फीने शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क' या चित्रपटाची पोस्टही शेअर केली होती. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले - 20 वर्षांपूर्वी जेव्हा 'इश्क विश्क' रिलीज झाला, तेव्हा मी शाहिद कपूरच्या इतक्या प्रेमात पडलो की मी त्याचे नाव 100 डायरीमध्ये लिहिलं होतं. मात्र त्याचं लग्न झाल्यावर मी खूप रडले होते, असं उर्फीने सांगितलं होतं.

शाहिद कपूरने 2015 मध्ये मीरा राजपूतसोबत लग्न केले होते. दोघांना आता दोन मुलं आहेत. नुकताच शाहिदचा 'ब्लडी डॅडी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.