UPSC : सांगलीचे IPS सुपुत्र प्रवीण कोळपे यांची हत्तीवरुन जंगी मिरवणूक, लोकप्रतिनिधींनी वाटली साखर

सांगलीतील आयपीएस प्रवीण कोळपे यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी साखर वाटत आनंद साजरा केला.

| Updated on: Mar 14, 2026 | 10:59 PM
1 / 5
 केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेले सांगलीतील आटपाडीचे सुपुत्र प्रवीण कोळपे यांची हत्तीवरून जंगी मिरवणूक काढण्यात आली, यावेळी गावकऱ्यांना साखरही वाटण्यात आली.

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेले सांगलीतील आटपाडीचे सुपुत्र प्रवीण कोळपे यांची हत्तीवरून जंगी मिरवणूक काढण्यात आली, यावेळी गावकऱ्यांना साखरही वाटण्यात आली.

2 / 5

आयपीएस बनलेल्या प्रवीण कोळपे यांचे स्वागत त्यांच्या आटपाडीत हत्तीवरून मिरवणूक काढीत करण्यात आले. विशेष म्हणजे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडीतील गावकऱ्यांना साखरेचे वाटप केले.

3 / 5

पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि हजारो आटपाडीकरांच्या साक्षीने ही ऐतिहासिक मिरवणूक काढण्यात आली आणि प्रवीण कोळपे यांनी मिळवलेल्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला.

4 / 5

युपीएससीची परिक्षा ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असते. यंदा महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

5 / 5

प्रशासकीय सेवेत काम करण्याचे स्वप्नं अनेकांचे असते. यासाठी युपीएससी परीक्षेसाठी साधारण नऊ हजार विद्यार्थी या परिक्षेसाठी बसतात. त्यातील ९०० विद्यार्थी उत्तीर्ण होतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us