
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे.

उर्मिलाने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटो पोस्ट केले आहेत. मिनी स्कर्ट आणि त्यावर टॉप असा हा तिचा लूक आहे. त्यावर तिने बराच मेकअपसुद्धा केला आहे. परंतु या फोटोंमध्ये उर्मिलाचा चेहरा वेगळाच दिसत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

उर्मिलाचा चेहरा या फोटोंमध्ये नेहमीपेक्षा अत्यंत वेगळा दिसत असल्याचं काहींनी म्हटलंय. हे फोटो AI जनरेटेड आहे का, असाही प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. उर्मिलाने बोटॉक्स किंवा प्लास्टिक सर्जरी करून इतका लूक बदलला असल्याची शक्यताही काहींनी वर्तवली आहे.

उर्मिलाने फोटो काढताना जरा कमी फिल्टर्स वापरावेत, अशी कमेंट एकाने केली. तर 'एकतर हे 10GB एआय एडिट असेल किंवा 10 किलो घटवून ओझेंम्पिक झाली असेल. आणखी एक नैसर्गिक सौंदर्य कृत्रिम दिखाव्याची बळी ठरली', अशा शब्दांत दुसऱ्या युजरने नाराजी व्यक्त केली.

उर्मिलाने तिच्या चेहऱ्याचं केलंय तरी काय, असाही सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. काही महिन्यांपूर्वी उर्मिला तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली होती. उर्मिला तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे.