
नेहमीप्रमाणे, उर्वशी रौतेलाने कान्सच्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवताच तिची चर्चा सुरू झाली. तिच्या शेवटच्या दोन लूकमध्ये, तिने तिच्या ड्रेसमुळे लक्ष वेधलं.

तिच्या नव्या लूकबद्दल बोलायचं झालं तर उर्वशीचा ड्रेस अप्रतिम होता. ती नखशिखांत सजली देखील, मात्र तरीही ज्या गोष्टीने लोकांचे सर्वात जास्त लक्ष वेधले आहे ती म्हणजे तिची हँडबॅग, जी बिकिनीच्या आकारात होती.

उर्वशीने रेड कार्पेटवर तिचा हँडबॅगही चांगलीच गाजवली. कॅमेऱ्यासमोर बॅग घेऊन तिने बऱ्याच पोझ दिल्या.

उर्वशीच्या या अनोख्या हँडबॅगबद्दल बोलायचे झाले तर, तिची ही बॅग ज्युडिथ लीबर कॉउचरची आहे. या बस्ट गोल्ड बिकिनी बॅगची किंमत 5.32 लाख रुपये आहे.

तर उर्वशीच्या ड्रेसबद्दल सांगायच झाल्यास, तिने जॉलीपॉली कस्टम कॉउचरचा सोनेरी गाऊन घातला होता. मात्र उर्वशीच्या फोटोशूटमुळे एक वेल अशी आली की तिथे पायऱ्यांवर चक्क (ट्रॅफिक) जाम सारखी परिस्थिती होती.

खरंतर, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पायऱ्यांवर पोज देताना दिसत होती. या वेळी, खाली येणारे सर्व पाहुणे फोटोबॉम्ब न करता खाली उतरण्याचा प्रयत्न करताना होते.

मात्र पायऱ्यांवर लोक उभे असलेले पाहूनही, उर्वशीने तिचं फोटोसेशन कायम ठेवलं. ती नेहमीच तिच्याच जगात असते, अशी कमेंट काही लोकांनी त्यर केली.