
केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मँगनीज या सारखे खनिजे असतात. हे खनिजे दात पांढरे करण्यासाठी मदत करतात. या केळीच्या सालीमध्ये बेकिंग सोडा मिसळला तर दात पांढरे होतात.

दात स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी केळीची साल घेऊन त्याचा आतील भाग दातांवर चोळा. साले वरपासून खालपर्यंत वर्तुळाकार गतीने घासून घ्या. केळीचे पोषक तत्व दातांना लागेल असे घासून घ्या.

एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट केळीच्या सालीमध्ये मिसळून दातांवर लावा. 2-3 मिनिटे ही पेस्ट ठेवा. त्यानंतर पाण्याने गुळणे करुन घ्या. आठवड्यातून दोन वेळा ही प्रक्रिया करा.

केळीच्या सालीमध्ये आढळणारे खनिजे दातांच्या पृष्ठभागावर पोहोचतात आणि पिवळेपणा कमी करतात. तसेच बेकिंग सोडा नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करतो. जे दातांच्या वरच्या थरातील डाग काढून टाकतो. तसेच बेकिंग सोडामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात, जे दातांचे पिवळेपणा कमी करतात.

नैसर्गिक आणि सुरक्षित हा उपाय आहे. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तुम्ही ते नियमितपणे वापरू शकता. केळी आणि बेकिंग सोडा प्रत्येक घरात सहज उपलब्ध आहे. त्यामुळे हा उपाय सोपा आहे.