
आजकाल धावपळीच्या जीवनात सर्वजण आपल्या चेहऱ्याची, त्वचेची नीट काळजी घेऊ शकत नाहीत. यामुळेच त्वचेसंदर्भात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळेस त्वचेवर डाग पडतात, पिगमेंटेशन येते. ते दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता, कोणते पदार्थ वापरू शकता ते जाणून घेऊया.

तुळशीची पाने - तुम्ही तुलशीच्या पानांचा वापर त्वचेसाठी करू शकता. त्यासाठी तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत व ती मिक्सरमधून बारीक करून पेस्ट तयार करावी. त्यानंतर त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. हे चेहऱ्याला लावावे. थोड्या वेळानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा.

बटाटा - बटाटा हा खाण्यासाठी तसेच त्वचेसाठीही वापरला जातो. बटाट्याची सालं काढून टाकावीत. नंतर बटाटा किसून त्याचा रस काढावा व तो चेहऱ्यावर जिथे डाग पडले आहेत तिथे लावावा. थोड्या वेळाने रस वाळल्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. बटाट्याच्या रसाने पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.

गाजर - गाजर स्वच्छ धूवून नंतर किसून घ्या. त्यात थोडी मुलतानी माती व अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. हे सर्व नीट मिक्स करा आणि त्वचेवर लावा. थोडा वेळ तसेच राहू द्यावे. नंतर काही वेळाने आपली त्वचा साध्या पाण्याने धुवा.

साय - एका भांड्यात थोडी साय घ्या. त्यात लिंबाचा रस घाला. हे नीट मिक्स करून चेहऱ्याला लावावे. तसेच चेहऱ्यावर थोडा वेळ राहू द्यावे. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. या उपायांच्या मदतीने पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल.