
मध त्वचेला हायड्रेटेड ठेवतं. त्वचेवर जर मुरूम आले असतील तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही मध चेहऱ्याला लावू शकता. मध नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. साबण आणि फेस वॉश ऐवजी तुम्ही हा पर्याय सुद्धा करून बघू शकता.

काकडीमुळे चेहरा मुलायम होतो. तुमची त्वचा जर कोरडी असेल तर काकडी मुळे ती चमकदार होईल, थंड होईल. चेहऱ्यावर काकडीचा रस किंवा त्याचा पल्प वापरा. यामध्ये असलेल्या मॉइश्चरायझिंग गुणधर्मांमुळे तुमची त्वचा मुलायम होईल.

कोरफड जेल एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आणि अँटी-इंफ्लेमेटरी आहे, जे त्वचा निरोगी ठेवते. त्वचेची जर जळजळ होत असेल तर कोरफड हा उत्तम उपाय आहे. कोरफडीने चेहरा चमकतो.

दूध त्वचेसाठी खूप चांगले असते. दूध त्वचेला मॉइश्चरायझ करते. स्किम्ड मिल्क वापरलं जाऊ नये याची मात्र काळजी घ्या. दुधाची साय सुद्धा चेहऱ्याला लावायला उपयुक्त ठरते. ते लावून चेहऱ्याची मालिश करा.

आपण चेहरा धुण्यासाठी साबण, फेसवॉश अशा अनेक गोष्टी वापरतो. त्यावर बराच खर्च करतो पण तुम्हाला माहितेय का तुमच्या घरात असणारं ओटमील एक नैसर्गिक स्क्रब आहे. ओटमील चेहऱ्याला लावा ते एक क्लासिक क्लिंजर आहे.