रात्री अपरात्री लोक मला रेट विचारतात, वडापाव गर्लचं धक्कादायक विधान
सध्या व्हायरल वडापाव गर्ल चंद्रिका चांगलीच चर्चेत आहे. तिने एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. तिला येणारे भयानक मसेजबाबत तिने सांगितले आहे.

सोशल मीडियावर कधी कोण व्हायरल होईल आणि एका रात्रीत स्टार बनेल हे सांगता येत नाही. अशीक एक वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यानंतर तिला बिग बॉस ओटीटीमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि चंद्रिकाचे नशीब पलटलं. पण गेल्या काही दिवसांपासून चंद्रिका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. तिने केलेल्या वक्तव्याने नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे.

चंद्रिकाने एका मुलाखतीमध्ये मुलाचा सांभाळ करण्यासाठी कोणासोबतही झोपण्यास तयार असल्याचे म्हटले होते. तिच्या एका विधानाने सर्वत्र खळबळ माजली. नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता चंद्रिकाने तिला लोक रात्री अपरात्री रेट विचारत असल्याचे सांगितले आहे.

चंद्रिकाने नुकताच एका पॉडकास्टमध्ये या विधानाबाबत वक्तव्य केले. ती म्हणाली, लोकांचे टोमणे ऐकून आणि टीकेमुळे आता वैताग आला आहे. कृपया त्या गोष्टीला योग्य प्रकारे समजून घ्या. तो व्हिडिओ आजही लोक मला पाठवतात. म्हणतात, ‘तू झोपण्यास तयार आहेस, सांग किती पैसे घेशील?’ मला आजही असे मेसेज येतात.

पुढे ती म्हणाली, मी हात जोडून सांगते की, माझा असा काहीही हेतू नव्हता. ते एक भावनिक आई भावनेच्या भरात बोलून गेली. तो पॉडकास्ट साडेतीन तासाचा होता. ज्यांनी पूर्ण पाहिला त्यांनी मला मेसेज केले की, ‘दीदी, तुम्ही रडवलेच.’

शेवटी चंद्रिका म्हणाली, मी कधीही चुकीचे काम केले नाही आणि असे कधी करणारही नाही. बाकी तुम्ही तुमचे मालक आहात. या पॉडकास्टमध्ये चंद्रिकाने आणखी एक धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, एका पॉर्न चॅनेलवरही तिचा फोटो वापरला गेला होता. तो पाहून तिला राग अनावर झाला होता. ते फोटो पाहून तिच्या डोक्यात स्वत:ला संपवण्याचाही विचार आला होता.