चारित्र्यावर संशय, बाळही नाकारलं… वैष्णवीच्या FIR मध्ये धक्कादायक गोष्टी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दाखल तक्रारीनुसार तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला होता. तसेच तिच्या बाळालाही तिच्या पतीने नाकाले होते.

| Updated on: May 21, 2025 | 10:09 PM
1 / 5
वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे. वैष्णवीने प्रेमविवाह केला होता. या लग्नात तिच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोनं, फॉर्च्यूनर गाडी तसेच इतरही महागड्या वस्तू दिल्या होत्या.

2 / 5
मात्र घरच्यांचा सततचा जाच आणि चारित्र्यावरून घेतल्या जात असणाऱ्या संशयामुळे तिने शेवटी आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. असं असतानाच तिच्या वडिलांनी दाखल केलेली तक्रार समोर आली आहे.

3 / 5
वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तसेच वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी तिचे बाळही नाकारले होते, असाही आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केलाय.

4 / 5
ऑगस्ट 2023 मध्ये माझी मुलगी वैष्णवी ही गरोदर राहीलेली होती. ही आनंदाची बातमी शशांक यास सांगितली असता शशांक याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तसेच हे बाळ माझे नाही दुसऱ्या कोणाचेतरी असेल असे म्हणून तिचे पती शशांक व सासरच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण केले, असे या तक्रारीत नमूद आहे.

5 / 5
तसेच, तिला मारहाण केली होती. त्यामुळे शशांक याने वैष्णवी हीस जबरदस्तीने शिवीगाळ व मारहाण करुन माझ्या राहत्या घरातून चालती हो, नाहीतर मी तुला हकलून देईन असे म्हणून घरातून हाकलून दिले होते, असंही या तक्रारीत सांगण्यात आलंय.