भलामोठा गुलमोहर वृक्ष थेट कार आणि दुचाकीवर कोसळला! वसईत थोडक्यात मोठा अनर्थ टळला

Vasai Tree collapse : वसई विरार शहरात अशी अनेक धोकादायक झाड आहेत दरवर्षी शहरातील झाडांच ऑडीट होतं. मात्र तरीही अशी झाडं पालिका तोडत नसल्याने नागरिकामधून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे.

| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 7:30 PM
1 / 5
वसईत दोन कार आणि एका मोटारसायकलवर  मोठे गुलमोहराचं  झाड कोसळलं आहे. यात वाहनाचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन, पडलेल्या भल्यामोठ्या झाडाला बाजूला काढलंय.

2 / 5
वसई पश्चिमेकडील ओम नगर येथील,  के.टी. विहार कॉम्पलेक्स इथं रस्त्यावर रविवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

3 / 5
दुपारची वेळ असल्यामुळे सुदैवाने रस्त्यावर गर्दी कमी होती, त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.

4 / 5
कोसळलेले झाड हे  धोकादायक स्थितीत असल्याने  स्थानिक नागरीकांनी पालिकेला अनेकवेळा सूचना  दिल्या होत्या. मात्र पालिकेने लक्ष दिलं नसल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

5 / 5
वसई विरार शहरात अशी अनेक धोकादायक झाड आहेत दरवर्षी शहरातील झाडांच ऑडीट होतं. मात्र तरीही अशी झाडं पालिका तोडत नसल्याने नागरिकामधून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे.