
आपल्याकडे पैसे असावेत आपण श्रीमंत व्हावे यासाठी रोज अनेकजण जीवापार कष्ट करतात. परंतु कितीही प्रयत्न केले तरी पैशांची चणचण काही संपतच नाही. हा अनुभव अनेकांना आला असेल. हे वास्तूदोषामुळे होऊ शकते.

त्यामुळेच तुम्ही काही वस्तुशास्त्राचे नियम पाळले तर तुमच्याजवळ धनसंपत्ती, पैसे टिकून राहू शकतात. यातील पहिला उपाय म्हणजे घराची उत्तर दिशा स्वच्छ ठेवावी. वास्तूशास्त्रानुसा घराची उत्तर दिशा ही संपत्तीच्या प्रवेशाचे द्वार असते. त्यामुळे ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी.

तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला जाळे लागले असतील तर ते लगेच स्वच्छ करावेत. दरवाजावरचे जाळे काढून त्यावर स्वास्तिक काढावे. वास्तूशास्त्रानुसार दरवाजाला जाळे असेल तर लक्ष्मी मातेला घरात येण्यात बाधा निर्माण होतात.

तुमच्या घरात नेहमी लक्ष्मी, संपत्ती, पैसे टिकून राहावेत असे वाटत असेल तर प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा करावी. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्याकडे पैसे टिकून राहतील.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.